

Ward 11 (Bazaarpeth) and Ward 17 (Hariharpeth) at the Center of Dispute
Sakal
श्रीकांत राऊत
अकोला : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. विशेषतः प्रभाग क्रमांक ११ (बाजारपेठ) आणि प्रभाग क्रमांक १७ (हरिहर पेठ) या दोन महत्त्वाच्या प्रभागांतील जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद तीव्र झाले असून, चर्चेचे गुऱ्हाळ तिथेच अडकले आहे. या दोन प्रभागांमुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.