Corona Restrictions | नागरिकांना दिलासा; निर्बंधात अंशतः बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 निर्बंध

अकाेला : नागरिकांना दिलासा; निर्बंधात अंशतः बदल

अकोला : कोरोना आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता लक्षात घेवून तसेच पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोस ७७ टक्के तर दोन्ही डोसचे ४४ टक्केपेक्षा जास्त लसीकरण झाले असल्याने निर्बंधात शिथीलता देण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता ९ जानेवारी रोजी निर्गमित केलेल्‍या आदेशात अंशतः बदल करुन मंगळवार (ता. १) पासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

हेही वाचा: प्रेमप्रकरणात मुलगी ठरत होती अडसर ;प्रियकरासह रचला कट

अशी मिळाली सवलत

अंत्‍यविधीकरीता उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा राहणार नाही. परंतु कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, मनोरंजन उद्याने, संग्रहालये, किल्‍ले सामान्‍य लोकांसाठी व इतर तिकीट असलेली ठिकाणे, सफारी ऑनलाइन तिकिटासह नियमित वेळेनुसार खुली राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. या बाबत संबंधित अनुज्ञप्‍ती अधिकारी यांनी त्‍यांचे स्‍तरावर आवश्‍यक ते निर्बंध लावण्‍यात यावे.

हेही वाचा: पंधरा विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र! दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळेतच

जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे ज्यांचे तिकीट आहे ते नियमित वेळेनुसार खुले राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. या बाबत संबंधित अनुज्ञप्‍ती अधिकारी यांनी त्‍यांचे स्‍तरावर आवश्‍यक ते निर्बंध लावण्‍यात यावे.

ब्यूटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षममतेसह सुरू राहतील. दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. हेअर कटींग सलून मधील इतर उपक्रम असल्‍यास ते पूर्णतः बंद राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील. काम करणाऱ्या व्‍यक्‍तींनी लसीकरणाचे दोन्‍ही मात्रा घेणे बंधनकारक राहील. व्‍यक्‍तींच्‍या हालचालीवर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पूर्णतः बंदी राहील.

Web Title: Consolation To The Citizen Restrictions Change Collectornima Arora Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top