Akola : ओबीसींना व्यवस्थेबाहेर ठेवण्याचे षडयंत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

ओबीसींना व्यवस्थेबाहेर ठेवण्याचे षडयंत्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित ओबीसी विचार मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड व कार्याध्यक्ष ॲड. संतोष रहाटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. प्रास्ताविकात ॲड. रहाटे यांनी ओबीसीचे आरक्षण गेले तर ओबीसी समाज त्याबाबत जागृत नसल्याने ओबीसी मेळाव्याचे आयोजन करावे लागत असल्याचे सांगितले.

विदर्भातील ओबीसीच्या राखीव जागांवर निवडून आलेले ७२ जिल्हा परिषद व ८९ पंचायत समिती सदस्यांचे पदं रद्द झाली. त्या जागा सर्वसाधारण गटातून भरण्यात आल्यात. त्यात ओबीसी सदस्यांनाच पराभव पत्करावा लागला. आता अकोल्यातील १४६ ग्रामपंचायत सदस्य, बुलडाणा १४६, नागपूर २०८, गोंदिया १४४, वाशीम १३२ असे एकूण ७७९ ओबीसी ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. केंद्र व राज्य शासनामुळे ओबीसीचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींनी संघटित होण्याची गरज असल्याचे ॲड. रहाटे यांनी सांगितले. त्यानंतर ओबीसी मेळाव्याला उपस्थित विविध जिल्ह्यातील प्रतिनिधिंनी त्यांचे मत व्यक्त केले.

शेवटी बालमुकुंद भिरड यांनी ओबीसी आक्षणाबाबतचे ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. या मेळाव्याला प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, प्रा. डॉ. संतोष हुसे, डॉ. नीलेश उन्हाळे, गोपाल कोल्हे, ज्ञानेश्वर सुलताने, रणजित वाघ, मुस्ताक शाह, गोपाल राऊत, मंदाताई कोल्हे, कांशीराम साबळे, शोभा शेळके, अनिल शिंदे, ॲड. नरेंद्र बेलसरे, गोपाल गाडगे, शंकराव इंगळे, राम गव्हाणकर, नागोराव पांचाळ, आदींसह अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्य ओबीसी विचारवंतांची उपस्थिती होती. संचालन सुवर्णा जाधव यांनी केले.

loading image
go to top