खामगाव - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरूषांच्या विचारांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. सत्तेत भाजपसोबत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा पुरोगामी आहे. याच विचारधारेवर काम करत सर्व समाजघटकाला न्याय देण्यासाठी आपण कायम प्रयत्नरत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सांगितले.