लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची अवहेलना

लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची अवहेलना
लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची अवहेलना
लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची अवहेलनाअकोट

अकोट (जि.अकोला) ः नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) गोल बाजार येथील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) प्रशासनाच्या शून्य नियोजनामुळे प्रचंड गोंधळ उडाला असून, ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना होत असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केल्याने काहीकाळ लसीकरण बंद केले होते. Contempt of seniors at vaccination center at Akot

या प्रकारबाबत नायब तहसिलदार हरिष गुरव यांना माहिती मिळाल्याने केंद्रावर तत्काळ भेट देऊन नागरिकांची समजूत काढल्यानंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोसची मुदत संपली तरी लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे.

बुधवारी शहरातील गोल बाजार परिसरात लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास २०० ते २५० नागरिक एकत्र गोळा झाल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. या लसीकरण केंद्रावर कोविड नियमावलीचे पालन होत नसल्याने हे लसीकरण केंद्र कोरोनाचे स्प्रेडर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोल बाजार केंद्रावरील लसीकरणा संदर्भात कुठलेच नियोजन न करता ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे करण्यात आले.

सकाळी सहा वाजल्यापासून या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. लसीकरणा संदर्भात कुठलीही सूचना देण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी हजर नसल्याने केंद्रावर २०० ते २५० लोकांचा जमाव एकत्र झाला, यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी दुसऱ्या डोसच्या उपलब्धते विषयी माहिती विचारली असता उपस्थित महिला वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उद्धटपणाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला.

याबाबत संतापलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्याने गोंधळ होत असल्याची माहिती वाजता स्थानिक पत्रकारांना दिली, वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराने लसीचा पुरवठा किती,आणि जेष्ठ नागरिकांसाठी कुठले नियोजन केले याबाबत विचारणा केली असता, या केंद्रावरील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देत,तुम्हाला माहिती देण्यासाठी मी बांधील नसल्याचे सांगत बेजबाबदार पणाची उत्तरे दिली. इकडे लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी वाढतच असल्याने अखेर नायब तहसीलदार हरिष गुरव यांनी स्वतः लसीकरण केंद्रावर भेट देऊन लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांची समजूत काढून स्वतः रांगा लावल्या.

ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी ताटकळत उभे

बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभ्या असलेल्या एका ८० वर्षीय आजी बाईला लस घेण्याकरिता तीन तास ताटकळत उभे ठेवण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देणे अपेक्षित होते; मात्र ओळखीच्या लोकांना आधी टोकन देऊन वशिलेबाजी करण्याचा प्रकार या केंद्रावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

साथ नियंत्रणासाठी की निमंत्रणासाठी

अपुरी व्यवस्था, नियोजनशून्य कारभारामुळे या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, फक्त १५० लोकांचेच लसीकरण होणार याबाबत आधीच लोकांना अवगत केले असते तर एवढा गोंधळ उडाला नसता,त्यामुळे गोल बाजारातील लसीकरण केंद्र साथ नियंत्रणासाठी आहे की निमंत्रण देणासाठी, अशी चर्चा शहरात दिवस भर सुरू होती.

Contempt of seniors at vaccination center at Akot

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com