
बाळापूर (जि. अकोला) : शहर आणि तालुक्यात गत पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बाळापूर तालुक्यातील खरिपाची ७५ टक्के पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेऊन ठेवले असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या विश्रांतीकडे लागले आहेत.