कोरोनामुळे विघ्नहर्ताही संकटात; साध्या पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 13 June 2020

 जिल्ह्यातील वाढते कोरोना संकट बघता यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिह मोहता यांच्या अध्यक्षतेत झालेला या बैठकीत २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवावर चर्चा करण्यात आली.

अकोला : जिल्ह्यातील वाढते कोरोना संकट बघता यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिह मोहता यांच्या अध्यक्षतेत झालेला या बैठकीत २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवावर चर्चा करण्यात आली.

‌अकोला शहरात गत १२७ वर्षांपासूनची गणेशोत्सवाची परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा सर्वदूर कोरोना संकट असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उत्सवावर अनिश्चिततेचे सावट बघता सर्व गणेशोत्सव मंडळांनी श्री मूर्ती लहान स्वरूपाची करून मंडपाचा आकारही लहान करण्यावर भर देण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मंडळांनी घरगुती लहान मूर्तींना प्राधान्य देऊन भव्यता कमी करण्यावर चर्चा करण्यात आली. मंडपात श्री भक्तांचे सॅनिटायझेशन करण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्यात. सर्व गणेश मंडळांनी या बाबीचे पालन करीत प्रशासनाच्या निर्देश व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ॲड. मोहता यांनी केले. ‌

या बैठकीत मंडळाचे सरचिटणीस सिद्धार्थ शर्मा, सचिव मनिष हिवराळे, सरचिटणीस विजय तिवारी, मंडळाचे कार्याध्यक्ष संग्राम गावंडे, सरचिटणीस विजय जयपिले, उपाध्यक्ष हरीश आलिमचंदानी, ॲड. सुभाषसिंह ठाकूर, सचिव संतोष पांडे, मनोज साहू, जयंत सरदेशपांडे, रामदास सरोदे, विक्की ठाकूर, उमाकांत कवडे, मनोज खंडेलवाल, संतोष अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona also disrupts disruption; Ganeshotsav will be celebrated in a simple manner akola marathi news