esakal | मृत्यूचे तांडव सुरूच; रुग्ण संख्येतही भर

बोलून बातमी शोधा

मृत्यूचे तांडव सुरूच; रुग्ण संख्येतही भर
मृत्यूचे तांडव सुरूच; रुग्ण संख्येतही भर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

अकोला ता. ४ ः जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, रुग्ण संख्येतही दररोज भर पडत आहे. कोरोनामुळे मंगळवारी (ता. ४) जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. Corona Cases and Lockdown News LIVE त्यासोबतच ७१८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ४७५ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ४) जिल्ह्यात २ हजार २७९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी त्यातील १ हजार ७९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ४८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत २३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्येत ४८४ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ४८४ पॉझिटिव्ह अहवालात १९८ महिला व २८६ पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमध्ये ४८, अकोट-६२, बाळापूर-३०, तेल्हारा-३५, बार्शीटाकळी-२९, पातूर-तीन, अकोला-२७७, अकोला ग्रामीणमध्ये ६६ तर अकोला मनपा क्षेत्रात २११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

असे आहेत मृतक

मंगळवारी पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष, पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला, बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष, पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला, लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला, वणी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिलेचा असा एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - २४२२७

- मृत - ७३७ त्यात

- डिस्चार्ज - ३५९९८

- ॲक्टिव्ह रुग्ण - ५६९२

जिल्ह्यातील २६ रुग्णालयांना मिळाले ४५४ रेमडेसिव्हिर

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती सुरू होती. त्याला मंगळवारी काही प्रमाणात ब्रेक लागला. जिल्ह्यातील २६ रुग्णालयांना ४५४ रेमडेसिव्हिरचे वाटप करण्यात आली. त्यामुळे इंजेक्शनच्या काळाबाजारालाही आळा बसण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील २६ रुग्णालयांना ४५४ इंजेक्शन्सचे वाटप करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिला. त्यानुसार हॉटेल रिजेन्सी यांना २८, ओझोन हॉस्पिटल २४, सहारा हॉस्पिटल २४, बिहाडे हॉस्पिटल २४, इंदिरा हॉस्पिटल २३, आधार हॉस्पिटल चार, नवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल २७, देशमुख मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १५, आयकॉन हॉस्पिटल ४२, स्कायलार्क हॉस्पिटल सात, हार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १४, अवघाते हॉस्पिटल १०, देवरा हॉस्पिटल २४, यकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल २१, सूर्यचंद्रा हॉस्पिटल २४, अकोल ॲक्सीडेंट आठ, क्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल येथे पाच, युनिक हॉस्पिटल १४, ठाकरे हॉस्पिटल १४, के.एस. पाटील २२, वोरा क्रिटीकल हॉस्पिटल २०, इनफिनीटी हेल्थ केअर पाच, आधार हॉस्पिटल २६, बबन हॉस्पिटल पाच, उशाई हॉस्पिटल ११ व राजेंद्र सोनोने हॉस्पिटल येथील १३ असे एकूण ४५४ रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर