esakal | ‘ब्रेक के बाद’ अकोल्यात कोरोनाचा भडका, रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona eruption in Akola, number of patients on the threshold of four thousand

मागील काही दिवसांपासून दिवसभरात ३० च्या आत रुग्णसंख्या आढळणाऱ्या अकोला शहर आणि जिल्ह्यात आणखी एकदा एप्रिल,मेमध्ये आढळणाऱ्या रुग्णसंख्येप्रमाणेच रुग्ण आढळत आहेत. कारण, रविवारी (ता.३०) दिवसभरात तब्बल ६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, आता ही रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

‘ब्रेक के बाद’ अकोल्यात कोरोनाचा भडका, रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला : मागील काही दिवसांपासून दिवसभरात ३० च्या आत रुग्णसंख्या आढळणाऱ्या अकोला शहर आणि जिल्ह्यात आणखी एकदा एप्रिल,मेमध्ये आढळणाऱ्या रुग्णसंख्येप्रमाणेच रुग्ण आढळत आहेत. कारण, रविवारी (ता.३०) दिवसभरात तब्बल ६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, आता ही रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.


रविवारी सकाळी ६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २६ महिला व ३९ पुरुष आहेत. त्यातील मोऱ्हाड (ता. बार्शीटाकळी) येथील १६ जण, सस्ती (ता.पातूर) येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण,

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बढे, सोनारी (ता. मूर्तिजापूर), पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सोंदाळा ता. तेल्हारा व बटवाडी (ता. बाळापूर) येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. शनिवारी रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

तर आज सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दरम्यान येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे.

२५ जण कोरोनामुक्त
रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६ जणांना,कोविड केअर सेंटर येथून १४ जण, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण तर ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण, अशा एकुण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अपडेट
एकुण पॉझिटिव्ह अहवाल- ३९४२
मृत्यू-१५१
डिस्चार्ज- ३१६९
दाखल रुग्ण -६२२
(संपादन - विवेक मेतकर)

loading image