आणखी दहा रुग्णांचा मृत्यू!

कोरोनाचे ७०८ नवे पॉझिटिव्ह
आणखी दहा रुग्णांचा मृत्यू!

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दहा रुग्णांचा गुरुवारी (ता. २०) मृत्यू झाला. त्यासोबतच ७०८ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ६०२ झाली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार १७० पर्यंत पोहचली आहे.

कोरोना संसर्ग तसासणीचे गुरुवारी (ता. २०) २ हजार ३९७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ८५१ अहवाल निगेटिव्ह तर ५४६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या चाचणीत १६२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी (ता. २०) कोरोनाचे ७०८ नवे रूग्ण आढळले. त्यापैकी आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ५४६ रुग्णांमध्ये २११ महिला व ३३५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गुरुवारी १२७ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

महापालिका क्षेत्रात आढळले १९८ रुग्ण

महापालिका क्षेत्रात गत काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी सुद्धा महापालिका क्षेत्रात १९८ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यासोबतच मूर्तिजापूरमध्ये ७९, अकोट-१४, बाळापूर-०७, तेल्हारा-१४, बार्शीटाकळी-८३, पातूर-९७, अकोला ग्रामीणमध्ये ५४ नवे रुग्ण आढळले.

असे आहेत दहा बळी

- पहिला मृत्यू डोंगरगिरी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास २० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

- दुसरा मृत्यू अन्य आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तिसरा मृत्यू पत्रकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौथा मृत्यू म्हाडा कॉलनी, कौलखेड येथील ६० वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

- पाचवा मृत्यू तिवसा येथील ४२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.

- सहावा मृत्यू चवरे प्लॉट येथील ३१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सातवा मृत्यू वाशिम बायपास येथील ७० पुरुष रुग्णाचा झाला. त्यांना दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.

- आठवा मृत्यू गायत्री नगर मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

- नऊवा मृत्यू खासगी रुग्णालयातील शिलोडा येथील ७० वर्षीय पुरुषाचा झाला. रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

- दहावा मृत्यू अन्य श्रावगी प्लॉट येथील ७३ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ३६१४५

- मयत - ६०२

- डिस्चार्ज - २९३७३

- ॲक्टिव्ह रूग्ण - ६१७०

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com