esakal | कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

आणखी सात रुग्णांचा मृत्यू

आणखी सात रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी आणखी सात जणांचा मृत्यू झाला तर ३३८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे अकोला मनपा क्षेत्रातील आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी कोरोना संसर्ग तपासणीचे १०८७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८५६ अहवाल निगेटीव्ह तर २३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड ॲन्टीजेन चाचणीत १०७ रुग्ण मिळून एकूण ३३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. मूर्तिजापूर तालुक्यात २७, अकोट नऊ, बाळापूर-चार, तेल्हारा-एक, बार्शीटाकळी १८, पातूर-१२, अकोला मनपा क्षेत्रात १४५ आणि अकोला ग्रामीणमध्ये १५ रुग्ण आढळून आलेत.

..........................

सात जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात काजळेश्वर, ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खदान येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते. बोरगाव मंजू येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते. महान ता.बार्शीटाकळी येथील २८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तर येलवन बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर बोरगाव ता. मूर्तिजापूर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

..............................

२७४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७, ठाकरे हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथून एक, समाज कल्याण मुलांचे वस्तीगृह येथून ११, देवसार हॉस्पीटल येथून तीन, अकोला ॲक्सीडेंट येथून चार, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथून दोन, हारमोनी हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून चार, अवघाते हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सात, आरकेटी येथून पाच, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तर होम आयसोलेशन मधील १७१ असे एकूण २७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर