या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण तीन हजार पार, दिवसभरात एक मृत्यू आणि 38 रुग्णांची वाढ

भगवान वानखेडे
Monday, 10 August 2020

अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. रविवारी (ता.९) आलेल्या एकूण ३८ पाॅझिटिव्ह अहवालांमुळे ही रुग्णसंख्या ३ हजार १९ वर जाऊन पोहचली आहे. तर रविवारी पुन्हा एका मृत्युची नोंद झाली आहे.

अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. रविवारी (ता.९) आलेल्या एकूण ३८ पाॅझिटिव्ह अहवालांमुळे ही रुग्णसंख्या ३ हजार १९ वर जाऊन पोहचली आहे. तर रविवारी पुन्हा एका मृत्युची नोंद झाली आहे.

रविवारी सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व २२ पुरुष आहेत. त्यात मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा,केळकर हॉस्पिटल येथील पाच,खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्या व ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्येत करण्यात आला आहे. सायंकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

त्यात तीन महिला व पाच पुरुष आहेत. त्यात अकोलखेड (ता.अकोट) येथील चार, पिंपरी ता.अकोट येथील दोन आणि खांबोरा येथील दोन याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना घरी सोडण्यात आले.

एका मृत्यूची नोंद
शनिवारी रात्री एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला तेलीपुरा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून ६ आॅगस्ट रोजी दाखल झाली होती. काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ३०१९
मृत्यू-११६
डिस्चार्ज- २४१५
दाखल रुग्ण -४८८
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients in akola district crossed three thousand, one death in a day and an increase of 38 patients