अरेच्या हे काय नवीन? कमी झाले पॉझिटिव्ह अन् वाढले निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच 1 हजार 7 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या सुद्धा 637 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तर कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या सुद्धा समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच 1 हजार 7 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या सुद्धा 637 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तर कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या सुद्धा समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. संसर्गामुळे होणाऱ्या सदर रोगाला आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वच उपाययोजना कमी पडल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी (ता. 14) जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 22 नवे रुग्ण आढळले असले तरी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील 637 रुग्णांनी कोरोला हरविल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. रविवारी (ता. 14) डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांपैकी तिघांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला व पाच पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण तापडीया नगर येथील, दोन जण गुलजारपूरा येथील तर उर्वरित अकोट फैल, तार फैल, सिंधी कॅम्प, शिवाजीनगर, खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 

319 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 51 रुग्णांचा (एक आत्महत्या व 50 कोरोनामुळे) मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 637 आहे. तर सद्यस्थितीत 319 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive cases increase in akola and negative also