esakal | कोरोनामुळे वाढणार या जिल्ह्यातील प्रकल्पांचा खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

akola road

जिल्ह्यातील रस्ते, उड्डाण पूल आणि सिंचन प्रकल्पांसह महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजनेतील कामांना कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे.

कोरोनामुळे वाढणार या जिल्ह्यातील प्रकल्पांचा खर्च

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : जिल्ह्यातील रस्ते, उड्डाण पूल आणि सिंचन प्रकल्पांसह महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या अमृत योजनेतील कामांना कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे. रस्ते वगळात इतर कामे बंद असून, आता पावसाळ्यातही ही कामे करणे अश्यक आहे. दुसरीकडे लॉकाडाउननंतर बांधकाम साहित्याचे दर वाढत असल्याने प्रकल्पांचा खर्चही वाढणार आहे.

जिल्ह्यातील प्रकल्प
अकोला जिल्ह्यातील विमानतळ भूसंपादन व विस्तारीकरण, राष्ट्रीय महामार्गाची कामे, अकोला ते महान रस्ता, अकोला ते मेडशी रस्ता, अमरावती ते खामगाव महामार्ग, अकोला-अकोट महामार्ग, शहरातील उड्डाणपूल, न्यू तापडिया नगर उड्डाणपूल, डाबकी रोड उड्डाणपूल, शेगाव ते देवरी फाटा रस्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जवळील मुलांचे ते वसतिगृह भुयारी मार्ग, अकोट ते वारखेड फाटा, अडसूळ ते हिवरखेड फाटा, मालेगाव बाजार ते सौंदळा, तेल्हारा त वारुळा, खापारखेड ते दापूरा फाटा, अकोट माळेगाव ते तेल्हारा, तेल्हारा व अकोट या दोन मुख्यालयांना जोडणारा वरवट बकाल ते तेल्हारा, मुंडगाग-अकोट रस्ता व अकोट येथील रेल्वे उड्डाणपूल आदी प्रकल्पांच्या कामांवर कोरोना लॉकडाउनचा प्रभाव पडला आहे.


न्यू तापडियानगर उड्डाण पुलासाठी हवा निधी
न्यू तापडियानगरकडे जाणाऱ्या मार्गावरील बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. पिल्लर उभे असून, पुढील काम मात्र थांबले आहे. काम रखडल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ही वाढत आहे. सन 2015 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात कामाला 3 वर्षांनी म्हणजे 2014 अखेरीस सुरुवात झाली. सध्या काम बंदच आहे. या कामासाठी नव्याने 18 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय निधी महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे.


डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलाचे कामही रखडले
अकोला ते गायगाव रोडवरील डाबकी रेल्वे गेटवर करण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे रेल्वे मार्गाच्या दोन्हीकडील काम पूर्ण झाले आहे. मात्र रेल्वे लाईनवरील कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. या पुलासाठी 2015 मध्ये 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आली होती. सध्याच या पुलावर 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. आणखी काही दिवस काम सुरू न झाल्यास या पुलाच्या कामाचा खर्चही दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.


214 कोटीच्या अकोला-अकोट रस्त्याचा खर्चही वाढणार
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी 2020 पासून रखडलेल्या अकोला-अकोट रस्त्याचे काम एप्रिलमध्ये सुरू करण्यात आले. या रस्त्यासाठी 214 कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र प्रकल्पाचे काम लांबवणीवर पडले असल्यानेया प्रकल्पाच्या खर्चातही आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.