
अकोला : सरणावर जाताना इतकेच कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते कविवर्य गझलकार सुरेश भटांच्या ओळी हृदयाचा ठाव घेत जरी असल्या तरी अकोल्यात मात्र, जगण्या बरोबरच मरणानंतरही माणसाचा छळ थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण येथील अकोटफैल बसस्थानकाजवळील मुख्य बाजारपेठेत एका कचोरी सेंटरच्या बाजूला 55 ते 60 वर्षीय पुरुषाचा मृतदेह पडून होता. सकाळी नऊ वाजता पासून या मृतदेहाला उचलण्यात कुणीच आले नाही. ही घटना रविवारी (ता.7) घडली. मात्र दोन ते अडीच तासानतंर एक रुग्णवाहिका आली आणि त्यांनी तो मृतदेह उचलून नेला.
दोन दिवसापूर्वी येथील दुर्गा चौकातील इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच एक 40 ते 45 वर्षीय व्यक्ती तीन ते चार तासांपासून पडून होता. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की, त्याला दुसरा कुठला आजार आहे. याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. असे असतानाही बॅंकेच्या मुख्य व्यवस्थापकाने महानगरपालिकेला कळविले असतानाही आरोग्य विभागाचा एकही अधिकारी तेथे पोहचले नव्हता. शेवटी तीन तासानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेत टाकून सर्वोपचारमध्ये हलविले. हा प्रकार शुक्रवारी (ता.5) दुपारी 11 वाजता घडली होती.
दोन तास एकही रुग्णवाहिका नाही फिरकली
दोन दिवसापूर्वी बँकेसमोर अज्ञात व्यक्ती पडत नसल्याने बँक व्यवस्थापकाने मनपासह जिल्हा प्रशासनाला कळविले होते. तेव्हा एक नव्हे तर तीन रुग्णवाहिका या ठिकाणाहून फिरकला होत्या. मात्र रविवारी अकोटफैलकडे या मृतदेहाला उचलण्यासाठी दोन तासात एकही रुग्णवाहिका फिरकली नव्हती.
हे असेच सुरू राहणार का?
कधी कर्मचारी संख्या कमी तर कधी कोरोनामध्ये अडकलेला अधिकारीवर्ग ही आणि अशी अनेक कारणे सांगत आहेत. त्या परिस्थितीत आणि घटनेवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. अशाच आता अकोला प्रशासन किती संवेदनशील आहे हे दिसून येत आहे. हे असेच सुरू राहणार का असाही सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत.
दोन तासानंतर नेला मृतदेह उचलून
सकाळी नऊ वाजतापासून पडलेला मृतदेह उचलण्यासाठी कोणत्याच विभाग सरसारवला नाही. शेवटी साडे अकरा वाजेनंतर एका रुग्णवाहिका आली आणि त्यांनी तो मृतदहे उचलून नेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.