esakal | सोयाबीनसह कपाशीचे बियाणे प्रयोगशाळेत फेल!
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीनसह कपाशीचे बियाणे प्रयोगशाळेत फेल!

सोयाबीनसह कपाशीचे बियाणे प्रयोगशाळेत फेल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला ः वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारणाऱ्या मोठ्या कंपन्यांचे सोयाबीनचे तीन बियाणे उगवणक्षमतेत फेल आढळले आहेत. त्यासोबतच एक कपाशीचे बियाणे सुद्धा बियाणे गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालात फेल आढळले आहे. त्यामुळे या बड्या कंपन्यावर कृषी विभागाच्या वतीने पुढे काय कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Cotton seeds with soybeans fail in laboratory!)

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिरमोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन व्हावे, यासाठी जमीन, पाणी, खत याप्रमाणेच उत्तम दर्जाचे बियाणे असणेही महत्त्वाचे असते. या बियाण्यांचे परीक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची बियाणे मिळावीत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी बियाणे तपासण्याची माेहीम राबविण्यात येते. त्यासाठी सात तालुका स्तराव सात व जिल्हास्तरावर एक पथक सुद्धा कार्यान्वित करण्यात येते. सदर पथक कृषी निविष्ठा विक्रेता दुकानात जावून बियाणे, खत व किटकनाशकांचे नमुने घेते. सदर पथकाने या खरीप हंगामात घेतलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांपैकी सोयाबीनचे तीन बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात फेल आढळले आहेत. त्यासोबतच एक कपाशीचे बियाणे सुद्धा फेल आढळले आहे. त्यामुळे सदर बियाणे विक्रेत्या कंपन्यांवर कृषी विभागाच्या वतीने काय करवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


प्रयाेगशाळेच्या अहवालानुसार सोयाबीनचे तीन तर कपाशीचे एक बियाणे प्रयाेगशाळेच्या तपासणीत फेल आढळले आहेत. सदर बियाणे ताकीदपात्र आहेत. त्यामुळे याविषयी नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
- मिलींद जंजाळ
माेहीम अधिकारी, कृषी विभाग, जि.प., अकाेला


Cotton seeds with soybeans fail in laboratory!

loading image