

Akola News
esakal
अकोट: प्रभाग ९ ब च्या नगरसेविका यांचे पती इमरान खान यांच्यावर प्रभागातीलच काहीनी जीवघेना हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी घडली. या हल्ल्यात आणखी दोघांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर अकोट येथील खाजगी दवाखान्यात, तर नगरसेविकेच्या पतीला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवीण्यात आले असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अकोट शहर पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, अकोट शहर पोलिस तपास करीत आहेत. इमरान खान अकबर खान (वय ३५ वर्ष), रा. इंदिरा नगर यांनी गुरुवारी(ता.१६) रात्री ११ वाजता फिर्याद दिली.