शाळा सुरू करण्याचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात, जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने अनेक प्रश्न केले उपस्थित

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 24 June 2020

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने अनेक प्रश्न उपस्थित करून शाळा सुरु करण्याचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकला आहे.

अकोला  ः जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने अनेक प्रश्न उपस्थित करून शाळा सुरु करण्याचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकला आहे.

शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिन्याआधी गावामध्ये कोणताही कोविड-१९ विषाणू लागण झालेला रुग्ण नसेल तरच शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण असताना ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेच्या दृष्टीने शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही. त्यात व्यवस्थापनाने सर्व खरदारी घेतल्यानंतर शाळा सुरू केल्यावर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण
झाल्यास शाळा प्रशासनावर पालक व समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विद्यार्थ्यांकडे आवश्यक संसाधने नसताना डिजिटल ई-लर्निनंग माध्यमातून शिक्षण अन्यायकारक आहे. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडून कोरोनाबद्दलची पालक व विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशन कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत शाळेच्या वर्ग खोल्या धुवून पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे. शाळेतील शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी विशेष लक्ष देऊन वेगळी व्यवस्था करावी.

शासनामार्फत विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्राईड मोबाईल किंवा टॅब वायफायसह मोफत उपलब्ध करून द्यावे. या बाबींची पुर्तता शाळा सुरू करण्यापूर्वी करावी, असे शिक्षण संस्था संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the court of the akola District Collector, the Board of Directors of the District Institute of Education presented a number of questions