
अकोला : जिल्ह्यात १९ ते २२ मे दरम्यान अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सातही १५७ गावे प्रभावित झाली. त्यासोबतच ९०९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात लिंबू, ज्वारी, आंबा, मूग, कांदा, भूईमूंग, केळी, संत्रा, सिताफळ इत्यादी फळपिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त १५ घरांची अंशतः पडझड झाली असून नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत.