धामणगाव बढे परिसरात पिकांचे नुकसान

Crops have been damaged due to rains in Dhamangaon Badhe area
Crops have been damaged due to rains in Dhamangaon Badhe area
Updated on: 

धामणगाव बढे (बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील रोहीणखेड परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे.

गारपिटीने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
 
परिसरातील रोहीणखेड, कुर्‍हा, गोतमारा, कोर्‍हाळा व परिसरात १९ मार्चच्या रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान सुसाट वादळी वार्‍यासह विजेचा गडगडाट व एक तासांच्या गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा, कांदा, कांदा बियाणे, काकडी, टरबूज अशा अनेक पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे. आधीच खचलेला शेतकरी उन्हाळ्याच्या रब्बीच्या हंगामातील शेती उत्पादनाच्या अपेक्षेत स्वप्न रंगवत असताना अवकाळी वादळी वार्‍यासह गारपिटीने शेतकर्‍याचे स्वप्न भंग केले. परिसरातील शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकर्‍या कडून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com