कोरोना इफेक्ट : या वर्गाचा अभ्यासक्रम जैसे थे; जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तके शाळांना सादर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

गुणवत्तावाढीसाठी शालेय शिक्षण विभाग अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करत असते. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता दुसरी व इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता.

तेल्हारा (जि.अकोला) : यावर्षी इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम बदलण्याचे नियोजन होते. पण कोरोनाचे आगमन झाले व मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे वेळेत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडणार नाहीत म्हणून की, काय तिसरीचा जुनाच अभ्यासक्रम कायम ठेऊन पुस्तकांची छपाई करण्यात आली. पुस्तकांचे शाळांना वाटप करण्यात आले.

गुणवत्तावाढीसाठी शालेय शिक्षण विभाग अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करत असते. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता दुसरी व इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. तर यावर्षी म्हणजे सत्र 2020-21 मध्ये इयत्ता तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे नियोजन होते. त्या नुसार बारावीचा अभ्यासक्रम बदलून पुस्तकांची छपाई होऊन पुस्तके बाजारात दाखल झालेत. 

महत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

पण कोरोना मुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून लॉकडाउन सुरू झाले. सर्वच कार्यालयातील कर्मचारी संख्या कमी करण्यात आली. यामुळे तिसरीच्या पुस्तकांची छपाई, बाईंडींग व वितरण वेळेत होण्याची शक्यता नसल्याने या वर्षी जुन्याच अभ्यासक्रमाची पुस्तके छापण्यात आली. अभ्यासक्रमाला देखील कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

तो अभ्यासक्रमास देखील छान
जुना अभ्यासक्रम राहिला तरी हरकत नाही तो अभ्यासक्रमास देखील छान आहे. विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळणे आवश्यक होते ते मिळाले आहेत.
-तुळशीदास खिरोडकार, शिक्षक जि. प.शाळा, खंडाळा (ता.तेल्हारा) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: curriculum of the third class was as it is in akola district