

Dagadparva Dam
sakal
बार्शीटाकळी : तालुक्यातील दगडपारवा येथील धरणात बुडालेल्या २९ वर्षीय युवकाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या काही मिनिटांत बाहेर काढला. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, बचाव पथकाच्या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.