esakal | मातीची दरड कोसळून मजुराचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

मातीची दरड कोसळून मजुराचा मृत्यू
मातीची दरड कोसळून मजुराचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) ः विटभट्टीसाठी माती खोदकाम करणाऱ्या मजुराचा गुरुवारी मादीची दरड कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बाळापूर तालुक्यातील सोनाळा (पूर्णा) येथे घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाळा (पूर्णा) येथून विटभट्ट्यांवर बाळापूरला दररोज सुमारे १०० ट्रकने माती नेली जाते. माती जेसिबीद्वारे उत्खनन केल्या जाते.

गुरुवारी या मातीची कराड खचल्याने चार मजूर दबले होते. यातील एका मजूर जाकिर अहमद (वय ३५) याचा अंगावर दरड कोसळल्यामुळे जागीच मुत्यू झाला. या घटनेतील दोन मजूर जखमी असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. हे मजूर लाॅकडाउनमुळे कामे बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मागील काही दिवसापासून माती खोदाईच्या कामावर येत होते. जाकीर अहमद याला चार मुले, पत्नी असून घरातील कमविता व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावर संकट कोसळले आहे.

संपादन - विवेक मेतकर