कामांची गती वाढविण्यासाठी जबाबदारी होणार निश्चित; आयुक्त कविता द्विवेेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"कामांची गती वाढविण्यासाठी जबाबदारी होणार निश्चित"

"कामांची गती वाढविण्यासाठी जबाबदारी होणार निश्चित"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : आढावा बैठका घेवूनही कामांची गती वाढत नाही. त्यामुळे आता अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिललाआहे. आयुक्त रुजु झाल्यापासून अनेक आढावा बैठका झाल्यात. दर आठवड्याला बैठक घेवूनही कामांची गती जैसे थे आहे. दर सोमवारी विविध विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर आयुक्तांना अपेक्षित असलेली कामाची गती वाढलेली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवार, ता २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत काम चुकार करणाऱ्या काही विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कामासाठी मुदत देवूनही प्रत्यक्षात कामात कोणतीच प्रगती होत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर बोट ठेवले जात आहे. ही योग्य बाब नाही. त्यामुळे कामांना गती येण्यासाठी आणि नागरिकांना तत्काळ दिलासा मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावण्यचा आदेश दिला.

ज्या विभागाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे, अशा काही विभागांना आयुक्त कविता द्विवेदी यांनी चांगलेच धारेवर धरले. या बैठकीला नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन विभाग, लेखा विभाग, मालमत्ता कर विभाग, पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभागाचे विभाग प्रमुख तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top