कोविड बळींच्या वारसांना अनुदानासाठी हेलपाटे!

हजारावर कोविड बळींच्या वारसांना अनुदानाची प्रतीक्षा
Waiting for grants covid victims death akola
Waiting for grants covid victims death akola sakal

अकोला - कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडल्यामुळे प्राण गमावलेल्या कोविड बळींच्या वारसांना शासनाने ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. परंतु अद्याप जिल्ह्यातील केवळ १ हजार १३३ कोविड बळींच्या वारसांनाच सदर अनुदान मिळाले असून उर्वरित वारसांना मात्र अनुदानासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. घरातील सदस्याचा जीव गेल्यानंतर सुद्धा अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कोविड बळी शासकीय अनास्थेचा शिकार होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेने गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा सामना केला. संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. तसेच आजारावरही अनेकांचा प्रचंड खर्च झाला. त्यामुळे कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य निधी जमा होत आहे. सदर अनुदानासाठी कोविड बळींच्या नातेवाईकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी बहुतांश अर्ज मंजुर सुद्धा झाले आहेत. परंतु अर्ज मंजुर झालेल्यांना अद्याप अनुदान न मिळाल्याने त्यांना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

तीनशेवर अर्ज अपात्र

कोरोनामुळे जिल्ह्यात १ हजार ४६९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दुबार अर्ज पकडून १ हजार ७०० कोविड बळींच्या नातेवाईकांनी शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज केले, तर २६० जणांच्या खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा सुद्धा झाले. अर्ज केल्यानंतर सुद्धा दोनशेवर ३०७ जणांचे अर्ज विविध प्रकारच्या त्रुट्‍यांमुळे अपात्र ठरले. परंतु संबंधितांनी पुन्हा अर्ज केल्याने त्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

जिल्ह्यातील कोविड बळींची संख्या

तालुका मृत्युमुखी पडलेले

तेल्हारा ५९

पातूर ६६

मूर्तिजापूर ११५

बार्शीटाकळी ८५

बाळापूर ११०

अकाेट १५३

अकाेला १२०

मनपा क्षेत्र ७२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com