esakal | आता गुळाला आले 'अच्छे दिन'', गुळाच्या चहाची वाढली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

jaggery tea

सध्या चहाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडून गुळाच्या चहाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

आता गुळाला आले 'अच्छे दिन'', गुळाच्या चहाची वाढली मागणी

sakal_logo
By
संतोष गिरडे

शिरपूर जैन (अकोला) : चहाला आता सेंद्रिय गुळाची गोडी लागली असून, गुळाच्या चहाची मागणी मागणी वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. गुळाचा चहा आरोग्यासाठी अतिशय चांगला मानला जात असल्याने नागरिकांचा याकडे अधिक कल वाढत आहे.

पूर्वी साखर कारखाने अस्तित्वात नसल्यामुळे देशात ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतात गुळाचे गुऱ्हाळ करायचे व त्यापासून गुळाची निर्मिली केली जात होती. चहा व इतर गोड पदार्थ बनवायचा असेल तर या गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र देशात नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने उभे राहिले. त्यामुळे साखरेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. परिणामी हळूहळू गुळाची जागा साखरेने घेतली.

माणसाच्या जीवनातून गुळ हद्दपार झाला होता. परंतु सध्या चहाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडून गुळाच्या चहाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. हॉटेलमध्ये आता गुळाच्या चहाची स्पेशल कॅटली दिसू लागली असून, सेंद्रिय गुळाचा चहा ग्राहकांना आवडीने पिण्यासाठी मिळत आहे. दरम्यान गुळाला आता "अच्छे दिन" आल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या बाजारातही गुळाला चांगला भाव आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले