देवेंद्र फडणविस यांची कोविड सेंटरला भेट, जीएमसीतीही पाहणी; रुग्णांची विचारपूस, उपचारांबाबत घेतली माहिती

सकाळ वृत्तसेेवा
मंगळवार, 30 जून 2020

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अकोला शहरातील वाढत्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थे बद्दल विचारपूस केली.

अकोला  ः माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अकोला शहरातील वाढत्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थे बद्दल विचारपूस केली.

अकोला जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. विदर्भात सर्वात जास्त मृत्यू दर व रुग्णांची संख्या अकोल्यात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापाठातील तिन्ही केंद्रांना भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व व्यवस्थेबद्दल पाहणी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महानगर आयुक्त संजय कापडणीस, वैभव आवारे व निवासी जिल्हाधिकारी डॉ. संजय खडसे, नीलेश अपार, विजय लोखंडे, प्रभारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकार घोरपडे, डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. सिर्साम, डॉ. अष्टपुत्रे आदी उपस्थित होते.

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी
जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वार्डाची पाहणी, ऑक्षीजन व आदी उपकरणांची माहिती तसेच पूर्ण हॉस्पिटलची पाहणी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी फडणवीस यांनी केली. औषधोपचार, साफसफाई, भोजन, डॉक्टरांचा व्यवहार याबाबत त्यांनी रुग्णांशी संवाद साधला.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis visits Kovid Center, also inspects akola GMC; Inquiries of patients, information taken about treatment