आरोग्यमंत्र्यानी धरले मनपासह जिल्हा प्रशासन धारेवर

8457.jpg
8457.jpg
Updated on

अकोला ः अकोल्यात सर्वाधिक रुग्ण हे महानगरपालिका हद्दीत आहेत. ही रुग्णसंख्या घटण्याऐवजी ती वाढतच आहे. याला जबाबदार कोण? याचा विचार करण्यात आता वेळ घालवू नका, महानगरपालिकेने स्वतःचा क्षमा वाढवावी आणि वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यास मदत करावी यासाठी वाटेल ती मदत करण्यास तयार आहोत. मनपा आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहीजे असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

ते येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी (ता.४) आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी महानगरपालिकेला सूचना केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे.

आरोग्यमंत्र्यानी अशा दिल्या मनपाला सूचना
१) मृत्यूदर हा कमी होण्यासाठी शेवटच्या क्षणी रुग्णालयात येणाऱ्यांना नागरिकांसाठी जनजागृती करा, महानगरपालिकेने युद्धस्तरावर सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले पाहीजे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा.
२) रेडिओलॉजिस्ट, स्क्रीनिंगची संख्या वाढवा. मनपाकडून डिटेक्शन कमी केले जाते. ते वाढवावे, सोबतच प्रतिबंधित क्षेत्र आणि त्या बाहेरील नागरिकांचे सर्व्हेक्षण करा.
३) असे आढळून आले आहे की, लोक खासगी रुग्णालयात उपचार घेतात. असे होऊ नये यासाठी महानगरपालिकेने स्वतःचे फिव्हर क्लिनिक वाढवावे. जेणेकरून नागरिक बाहेर खासगीमध्ये उपचार घेणार नाहीत. आणि रुग्ण आढळण्यास मदत होईल.
४) शहरात ९२ प्रतिबंधित क्षेत्र असे आहेत की, तेथे आता रुग्णवाढ होत नाही. तर याउलट ३४ झोनमधून रुग्ण बाहेर येत आहेत. तेव्हा पोलिसांनी आता ९२ झोनमध्ये अडकून न राहता ३४ प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावे.

अशा दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना
१) जीएमसीकडे फिजिशीयन, भूलतज्ज्ञांची संख्या कमी आहे तर आयएमएकडू प्रत्येक ५० डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करावी, अधिग्रहीत केलेल्या डॉक्टरांची सेवा आठवड्यातून दोन दिवस ठेवावी.
२) अकोल्यात बेडची संख्या कमी आहे असे लक्षात आले आहे. तेव्हा अकोल्यात पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त आॅक्सीजनयुक्त बेडची संख्या वाढवावी असे अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
३) अकोल्याच्या आरोग्य विभागात ९५८ रिक्त पदे आहेत. ती पदे भरण्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाला दिली आहे. महसूल उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा रिक्तपदे तत्काळ भरावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
४) जीएमसीमधील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा, कर्मचारी संख्या वाढवा, रुग्णालय परिसरात उच्च दर्जाची स्वच्छता ठेवावी.
५) ज्यांना घरी क्वॉरंटाईन व्हावे वाटत नाही त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल्स मालकांशी बोलून त्यांना कमी दरात हॉटेल्स उपलब्ध करून द्यावे, सोबतच कमी दरात जेवण कसे मिळेल याची जबाबदरी घ्यावी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com