

अकोला : निवडणुकीतील वेगवेगळ्या बाबींचा ‘डेटा’ अत्यंत मूलभूत असून, त्याचे संकलन व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सर्व स्तरावर समन्वय ठेवून निर्दोष व अचूकपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (ता. ४) नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत जि.प. सीईओ बी. वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, आरडीसी विजय पाटील यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की, निवडणुकीतील प्रत्येक बाबीची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांनी समजून घ्यावी व त्यानुसार अचूकपणे, तसेच वेळेत कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. उमेदवारांना आवश्यक परवानग्या वेळेत मिळण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘एक खिडकी’ योजना कार्यान्वित करण्यात येईल.
पोलिस बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. निवडणूक आयोगाच्या सूचनेचे पालन करावे. ‘स्वीप’च्या माध्यमातून व्यापक मतदार जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन आवश्यक आहे.
जि.प.चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी धोंगडे यांच्याकडे खर्च व्यवस्थापन, प्रसारमाध्यम व संदेशवहनची जबाबदारी हर्षवर्धन पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नोडल अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव हे आहेत. दिव्यांग कक्षाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांच्याकडे, तर निवडणूक निरीक्षकांचे मुख्य संपर्क अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.