esakal | Breaking : अकोल्यामध्ये पुन्हा निर्बंध; मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

District Collector Jitendra Papalkar announced that a complete lockdown will be enforced in Akola district from Tuesday

जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापूर शहर व अकोट शहर हे तीन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून, या तिन्ही शहरांमध्ये मंगळवार, २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन लागू राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केली.

Breaking : अकोल्यामध्ये पुन्हा निर्बंध; मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन देखील यासाठी उपाय योजना करीत आहे. जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापूर शहर व अकोट शहर हे तीन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून, या तिन्ही शहरांमध्ये मंगळवार, २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन लागू राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केली. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांचीच घाेषणा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले असून हे शहर वगळता तालुक्यातील इतर गावे तसेच तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यासाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश काढले आहे.

त्यानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि प्रतिष्ठाने केवळ सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंतच तर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. या आदेशानुसार जिल्हा पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या उबंरठयावरच येऊन ठेपल्याची चिन्हे आहेत.

असे आहेत निर्देश

केवळ जिवनाश्यक दुकाने, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील.

इतर सर्व प्रकारची दुकाने पुर्ण बंद राहतील

- ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.

-सर्व प्रकारची दुकाने, आस्थपना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालय बॅंका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.

- सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.

- लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील.

- मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही.

- चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर ३ प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवासी यांना परवानगी राहील.

- आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.

- सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

- सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील.

- सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व अतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.

- सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.