Akola Crime: हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ;सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Crime News: मानोरा तालुक्यातील सोयजना येथील सुजाता राठोड हिने दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी झालेल्या छळाच्या विरोधात पती व सासरच्या सहा जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोयजना येथील महिलेस माहेर येथून दोन लाख रुपये आण या कारणावरून पती व सासरच्या मंडळीने शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सुजाता खुशाल राठोड यांनी मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार केली.