महाबीज संचालकपदाच्या निवडणुकीत डॉ. रणजित सपकाळ, वल्लभराव देशमुख विजयी

महाबीजच्या दोन संचालकांच्या निवडीसाठी अकोला (विदर्भ) आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.
Dr Ranjit Sapkal and Vallabhrao Deshmukh
Dr Ranjit Sapkal and Vallabhrao Deshmukhsakal
Summary

महाबीजच्या दोन संचालकांच्या निवडीसाठी अकोला (विदर्भ) आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.

अकोला - संपूर्ण राज्यातील भागधारकांचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता.२२) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आला. अकोला (विदर्भ) मतदारसंघातून डॉ. रणजित नीळकंठ सपकाळ यांनी तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांनी विजय मिळविला.

महाबीजच्या दोन संचालकांच्या निवडीसाठी अकोला (विदर्भ) आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. विदर्भ मतदार संघातून अकोला येथील खासदार संजय धोत्रे यांचे निकवर्तीय डॉ. रणजित सपकाळ यांनी ८९६२ मतं घेत विजय मिळविला. त्यांनी अकोला येथीलच प्रशांत विश्वासराव गावंडे यांचा पराभव केला. गावंडे यांना दोन हजार ३२१ मतं मिळाली. २०७ मतं बाद झाली.

उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी विजय मिळविला. त्यांना पाच हजार ६६६ मतं मिळाली. त्यांनी बीड जिल्ह्यातील ॲड. विष्णुपंत सुभानराव सोळंके यांचा पराभव केला. ॲड.सोळंके यांना तीन हजार ३०९ मतं मिळाली तर २६५ मतं बाद झाली. मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक घेण्यात आली होती. यासाठी ता. १४ सप्टेंबरपर्यंत मतपत्रिका स्वीकारण्यात आल्यानंतर अकोला येथील मुख्यालयात ता. १५ सप्टेंबरपासून मतपत्रिकांची छाननी व वैद्य मतपत्रिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते. बुधवारी (ता.२१) हे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मोजणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कंपनी सचिव वर्मा यांनी काम बघितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com