Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांना अवघ्या २४ तासांत आले यश.
two accused arrested in balapur killed case

two accused arrested in balapur killed case

sakal

Updated on

बाळापूर - तालुक्यातील रिधोरा येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून दोन मित्रांनीच सचिन वाल्मीक खंडारे याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना भुसावळ आणि दर्यापूर येथून ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com