ढगाळ वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन

भीतीपोटी रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ; सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या तक्रारीत वाढ
viral infections
viral infectionssakal

अकोट : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन (Viral infections) झाले आहे.

या जिल्ह्यात यावर्षी थंडी प्रमाण निश्‍चितच लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणावरचा पाऊस (Rain), त्याचबरोबर इतरत्रचा वातावरणातील (Atmosphere) बदलसुध्दा कारणीभूत ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः दोन दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही.

viral infections
‘मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरेंकडे द्या’;संभाजी पाटील निलंगेकर

दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम हवेत कमालीचा गारवा आहे. थंड वारे आणि या गारव्यामुळेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणातील या बदलाने व्हायरल इन्फेक्शनसुध्दा होत आहे.

गारव्याने, थंड हवेने सर्वदूर सर्दी, खोकला, अंगदुखी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येवू लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या तक्रारींमुळे नागरीक कमालीचे अस्वस्थअ आहेत.भितीपोटीच काहींनी रुग्णालयाकडे जावयास सर्रास टाळाटाळ सुरु केली आहे. तर काहींनी कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रकारच्या चाचण्यासुध्दा करावयास सुरुवात केली आहे.

viral infections
औरंगाबाद महापालिकेची १५ लॅबला नोटीस

दैनंदिन व्यवहार मंदावले

वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत करणारे, ठप्प करणारे ठरत आहे. सकाळी सर्वदूर धुके पसरत आहेत. त्यामुळे सकाळचे दैनंदिन व्यवहार कमालीचे मंदावले आहेत.

घरगुती उपाय पडू शकतात महागात

कोविडच्या भितीमुळे अनेकांनी घरीत राहून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे टाळले जात आहे. घरगुती उपाय कोविड आजारामध्ये महागात पडू शकते. त्यामुळे दुसऱ्या लाटेप्रमाणे यावेळीही शेवटच्या टप्प्यात उपाचारासाठी येणाऱ्यांना प्राणास मुकावे लागू शकते. त्यामुळे घरगृती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेवून उपाचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com