Video : या कारणासाठी वंचित बहूजन आघाडीने सुरू केले डफली बजाओ आंदोलन

मनोज भिवगडे
Wednesday, 12 August 2020

कोरोना संकटामुळे ता.२४ मार्च पासून राज्यातील बस व रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता तातडीने बस व शहर बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी सकाळी राज्यातील सर्व बस स्थानकांपुढे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

अकोला ः कोरोना संकटामुळे ता.२४ मार्च पासून राज्यातील बस व रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता तातडीने बस व शहर बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी सकाळी राज्यातील सर्व बस स्थानकांपुढे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

अकोला शहरातील दोन्ही बसस्थानकांसह गांधी रोडवरील अकोला महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहा समोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफडी वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले.

कोरोना संकटामुळे सर्वच अडचणीत आले आहे. मात्र काळासोबत काही गोष्टी शासनाने सुरू करण्याची परवानगी दिली. व्यापार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे राज्यातील बस सेवा व रेल्वे सेवा बंदच आहे.

नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

प्रमुख शहरातील शहर बस सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गेली चार महिने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः हातावर पोट असलेले मजूर वर्ग कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहन व्यवस्थेचाच वापर करतात. त्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत.

त्यामुळे या वर्गावर मोठा अन्याय होतो आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही थांबविण्यात आले होते. शिवाय छोटे-मोठे व्यापारी प्रवाशी साधणे नसल्याने अडचणीत आले आहे. मालवाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे महागाई वाढत आहे.

सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

या सर्व अडचणी लक्षात घेता तातडीने बस सेवा सुरू करण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले.

अकोल्यात चार ठिकाणी आंदोलन
अकोला शहरातील जुने व नवे अशा दोन्ही बस स्थानकासह चार ठिकाणी वंचितच्या कार्यकार्त्यांनी ढोल व डफडी वाजवून घोषणा बाजी केली. नवीन बस स्थानकावर प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जुन्या बस स्थानकावर महिला आघाडी अध्यक्ष प्रभाताई सिरसाट, प्रतिभा सिरसाट यांच्या नेतृत्वात महिला आघाडीने आंदोलन केले तर महानगरपालिकेपुढे गजानन गवई यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. गांधी रोडवर खुले नाट्‍यगृहापुढे शहराध्यक्ष शंकरराव इंगळे आणि गजानन गवई, पराग गवई यांच्या उपस्थितीत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला
अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

 
महानगरपालिकेपुढे वाहतूक कोंडी
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेपुढे रस्त्यावर बसून शहर बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे काही काळासाठी गांधी रोडवरील वाहतुक विस्कळीत झाली होती. तहसील मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्याने या एकाच मार्गावर वाहनांची गर्दी होऊन कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duffy played for Akola News bus service, movement of deprived Bahujan Aghadi, demand for bus service and city bus service