वाहतूक पोलिसांचे ‘ई-चलन’ ठरते वाहनचालकांची डोकेदुखी

E-challans are being issued by the traffic police for no reason which is causing financial hardship to motorists
E-challans are being issued by the traffic police for no reason which is causing financial hardship to motorists

अकोला : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी आरटीओ कडे ‘ई-चलन मशिन’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मशिनद्वारे थेट केलेल्या कारवाईअंतर्गत दंडाची पावती थेट वाहनचालकांच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली जात असल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु, हिच सोय वाहनचाकांची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कुठलेही नियम मोडले नाही किंवा सर्व वाहनांचे सर्व कागदपत्र व्यवस्थीत असताना देखील वाहतूक पोलिसांकडून विनाकारण ‘ई-चलन’ दिला जात असल्याने वाहनचाकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

माल वाहू किंवा खासगी प्रवासी वाहनात कोणता रुग्ण असताना देखील वाहतूक पोलिसांसोबत काही आर्थिक व्यवहार केला नसल्यास वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून लगेच ऑनलाइन दंड केल्याचा मॅसेज मोबाईल वर येतो. त्यामुळे वाहनचाकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. विनाकारण होणाऱ्या या दंडामुळे वाहनचाकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचमुळे कधी-कधी खासगी वाहनचालक रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी स्पष्ट नकार देत असल्याने अनेक वेळा वाद निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

रुग्ण नेण्याचे भाडे कधी-कधी मिळत नाही. परंतु, वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड नक्की मिळत असल्याचे अनेक घटनांवरून पाहावयास मिळत आहे. वाहनचालकाची सर्व माहिती ई-चलनामुळे आरटीओकडे जमा आहे. कारवाई दरम्यान वाहनचालक पसार झाला, तर त्याचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक घेऊन चलन करून थेट वाहनमालकांना कारवाईबाबत मेसेज मिळतो. त्यानंतर मालकाला दंड भरावा लागते. एकदा केलेले चलन कोणत्याही परिस्थितीत रद्द केल्या जात नाही. वाहनचालक, मालकांना दंड न भरल्यास त्यांच्या नावावर दंड न भरलेली रक्कम दिसते. कधी-कधी विनाकारण होणाऱ्या या कारवाई बाबात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशा आहेत ‘ई-चलन’ मशिनच्या सुविधा

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून या ‘ई चलन’ मशिनद्वारे दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे. ती भरल्यानंतर त्याला लगेच पावती देण्यात येते. दंड वसूल करण्याचे ठिकाणही या मशीनमध्ये नमूद होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ऑनलाइन कारवाई करणे, वाहनाचे छायाचित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर करणे, दंड कपातीची माहिती वाहनचालकांच्या मोबाइलवर एसएमसद्वारे पाठविणे, दंड जागेवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता यावा म्हणून स्वाइप मशिन्स, पेंडिंग दंडाबाबत वाहनचालकाला ऑनलाइन पेमेंट सुविधा, कार्यालयात येऊन दंड भरण्याची सुविधा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com