कोरोना मुळे यंदाच्या ख्रिसमसला ग्रहण; मुंबईतील चर्चमध्ये तयारी सुरू

कोरोना मुळे यंदाच्या ख्रिसमसला ग्रहण; मुंबईतील चर्चमध्ये तयारी सुरू

मुंबादेवी : मुंबईसह देशभरात, जगभरात शांतिदूत म्हणून गणल्या जाणाऱ्या भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयास म्हणजेच 25 डिसेंबर नाताळ सणाच्या उंबरठ्यावर आला आहे. तरी, दुकानात विक्रीस असलेल्या सांताक्लॉझ, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल, सांताकॅप, चॉकलेट्स, केक्स, चॉकलेटी वाईन केक्स, जिंगल्स सॉंग टॉयज आणि वेगवेगळ्या टॉयजच्या मागणीत अजूनही हवी तशी वाढ होत नसल्याने विक्रेते चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. दक्षिण मुंबईत आताच्या तरुणाईला खास ख्रिस्तमस सणाचे वर्षभर आकर्षण असते. कारण बहुतांश मुलामुलींचे शिक्षण ख्रिस्ती चर्चच्या शाळेत (कॉन्वेंट हायस्कूल) मध्ये झाल्याने ख्रिसमस ची खरी मजा इथूनच सुरू होते.

शाळेत विद्यार्थ्यांना येशु ची चित्रे, येशुचा जन्मसोहळा, मंडप, डेकोरेशन, शेळया- मेंढ्यां, वाळलेल्या गवताची घरे, त्यातील महिला, पुरुष आणि मदर मेरीच्या कुशीत स्तनपान करताना जीजस ख्रिस्त असे विलोभनिय दृश्य प्रत्येक शाळेत पहायला मिळतेच मिळते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून क्राइस्ट सोसायटी ख्रिस्ती बांधव 24 डिसेंबरच्या रात्री 8 -10 वाजता आपापल्या विभागातील चर्च मध्ये आधुनिक पोशाखांसह प्रार्थना साठी उपस्थित राहतात. त्यात बहुतांश पुरूष आणि तरुण हे कोट, टाय, शूज परिधान करतात तर महिला या पारंपारिक पोशाखात असतात. तरुणी मात्र एखाद्या सिंड्रेला सारख्या नटूत येतात. विविध येशु प्रशंसनीय धार्मिक गीते वायोलियन, म्यूझिकवर सामूहिक पणे गायली जातात. चर्च चे फादर इन द नेम ऑफ द होली पीपल, इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करीत करीत येशूला नमन करीत उपस्थितांना संबोधित करताना होली बुक बाइबलमधील काही येशु जन्म अध्याय कथन करतात.

24 डिसेंबर च्या मध्यरात्री बरोबर येशु ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे जाहीर करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या संसर्ग पार्श्वभूमीवर येशु ख्रिस्ताच्या जन्मदिनावर कोरोनाचे सावट आल्याचे स्पष्ट पणे दिसत आहे. दक्षिण मुंबईत कुलाबापर्यंत हैप्पी ख्रिसमस ,मेरी ख्रिसमसची असलेली मोठी लगबग कोठेही आढळली नाही.

पूर्वी माझगाव, डोंगरी,उमरखाडी, गिरगाव, मरीन लाइंस, चिरा बाजार, व्हिक्टोरिया टर्मिनल्स म्हणजे आताचे CSMT सीएसएमटी परिसर, कुलाबा कॉजवे, कुलाबा परिसर , फोर्ट विभागात ख्रिस्ती समाज आपले मोठे अस्तित्व टिकवून होता. पण कालोघातात येथील ख्रिस्ती समाज भायंदर वसई, विरार, पालघर येथील असणाऱ्या समाजातील लोकांनी आपला मोर्चा मुळगावी वळवला त्यामुळे काही वर्षा पूर्वी मोठ्या दिमाखात साजरा होणाऱ्या नाताळ - ख्रिसमस सणाला थोड़ी उतरती कळा लागली होती त्याची उणिव भरून काढली. ती मराठी कुटुंबियाच्या कोव्हेन्ट स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

कोरोना मुळे आज पूर्वी सारखा उत्साह पहायला मिळत नसला तरी एक पारंपरिक सण म्हणून ख्रिस्ती आणि कन्वर्ट झालेला मराठी - कोळी ख्रिस्ती बांधव  दीपावली सणाप्रमाणे लाडू,करंज्या आणि शंकरपाळी उत्तम प्रकारे आजही करतात. गोवा फेनी, काजू फेनी, राइस फेनी, उच्चतम वाइन्स आणि वाइन्स केक चा खासा बेत आजही आखत आहेत.

- भारत वर्षाने जगाला शांतीसाठी बुद्ध, सत्य धर्माच्या रक्षणार्थ कृष्ण दिला तर एक पाऊल पुढे टाकत येशु ख्रिस्ताच्या रूपात शेजाऱ्यांवर प्रेम करा असा जगाला संदेश देत भगवान येशु ख्रिस्त शांतीसाठी क्रूसावर चढले.

-  मुंबईतील ख्रिसमससाठी प्रसिद्ध चर्च पाहिलीत तर बांद्रा येथील माउंट मेरी बॅसिलिका, सेंट पीटर चर्च,सेंट अ‍ॅन्ड्र्यूज चर्च, सेंट मायकेल चर्च, माउंट मेरी, पोर्तुगीज चर्च दादर,अवर लेडी ऑफ सेलव्हेशन चर्च, अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च, भायखळा,सेंट मेरी माझगाव, रोजरी चर्च, गिरगाव चर्च, फोर्ट चे सेंट थॉमस चर्च, कुलाबाकडे जाणाऱ्या मार्गावरील सेंट फ्रांसिस झेविअर, बॉम्बे बाप्टिस्ट चर्च असे प्रख्यात चर्चेस आहेत.येथे ख्रिसमस सणाची तयारी सुरु आल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले.


 302 वर्षाचे सर्वात जुने सेंट थॉमस चर्च
मुंबईत सन 1718 साली ब्रिटिश सरकारने बांधलेले मुंबईतील सर्वात जुने चर्च असून ते फोर्टच्या रिजर्व बैंक कॉलनी परिसरात आहे.यंदाचे 302 वे वर्ष साजरे करीत आहे. कोरोना काळात सरकारने दिलेले सामाजिक अंतर ठेवत मास्क बाबत नियम पाळत 25 डिसेंबरच्या सकाळी 9 ते 10 असा येशुचा जन्मोत्सव आनंदात साजरा करणार आहोत. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास लोकांना मिळणार नाही. पण जगात कोरोना संपवावा, जगात आनंदायी शांति व्हावी अशी प्रार्थना परमेश्वर पुत्र येशूला करण्यात येईल.  
अविनाश रंगय्या
(रेव्हरन्ड़ - सेंट थॉमस चर्च - फोर्ट)

Eclipse this Christmas due to Corona Preparations begin at a church in Mumbai

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 कुलाबा अफगान चर्च

अफगाण युद्धात धारातीर्थी पडलेल्या ब्रिटिश आणि ब्रिटीशांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ  1885 साली 7 जानेवारी रोजी कुलाबा येथील डिफेंस एरियात अफगाण चर्च बांधण्यात आले आज 162 वर्षे या अफगाण चर्चला झालीत.याचा अंतर्गत आवाका एवढा मोठा आहे की येथे 1000 लोक सहज प्रार्थना साठी उपस्थित राहु शकतात.आता चर्च फक्त रविवारी चर्च सकाळी 9 वाजता उघड़ते आणि 10 : 30 वाजता बंद होते. हा डिफेंस विभाग असल्याने येथे फक्त तेच संरक्षण खत्यातील लोकच येतात पण सर्वसाधरण लोकही येऊ शकतात. चर्चच्या आवारात सुंदर वृक्षवल्ली असून मोठा गारवा अनुभवन्यास मिळतो. सर्वोत्तम वृक्षराज आंबा, नारळ, वड़, पिंपळ वृक्ष अगदी डौलदार आणि विस्तीर्ण जागा व्यापत एखाद्या सैनिकांच्या तुकड़ी सारखे उभे आहेत. ही झाड़ेही तेव्हाच लावलेली आहेत. मिलेट्री छावनी असल्याने येथील सभोवतालचे वातावरण एखाद्या सैन्य तळावर आल्याचे मनोमन समाधान देते. चर्चचे मेंटनेंस चर्च करते. येथे केअरटेकर राजन मार्टिन करीत आहेत.

भगवान येशु ख्रिस्ताचा जन्म मानवाच्या कल्याणासाठी झालेला आहे.त्याच मुळे कोरोना काळात प्रभूच्या जन्मोत्सवात कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यास आपण समर्थ आहोत. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता चर्च उघडेल आणि ते 10:30 दरम्यान ख्रिस्त जन्म सोहळा आणि बायबल मधील महत्वाचे आशीर्वचन पठण, सर्व बांधवांना शुभेच्छा देत जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. 
-  रेव्हरन्ड़ स्वप्नील उझगरे
(अफगान चर्च - कुलाबा डिफेंस कॉलनी)

--------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com