Akola News: टपाल तिकिटावर साकारले सूक्ष्म राष्ट्रगीत;एदलापूरच्या विनायक धांडे यांचा ऐतिहासिक विक्रम
Vinayak Dhande Creates Record in Micro Writing: अकोट तालुक्यातील एदलापूरचा विनायक धांडे यांनी २ सेमी x २.५ सेमी आकाराच्या टपाल तिकिटावर संपूर्ण राष्ट्रगीत फक्त ४ मिनिटे ५० सेकंदात लिहून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव कोरले.
अकोट: जिद्द, एकाग्रता आणि कलेची ओढ असेल तर दुर्गम भागातील व्यक्तीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकते, हे एदलापूर (ता. अकोट) येथील सुपुत्राने सिद्ध केले आहे.