Education News : ‘एनआयई’ हे विद्यार्थ्यांसाठी सकस वैचारिक खाद्य; शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर

मुलांना मोबाईल, टिव्ही या उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठी एखादातरी छंद लावणे गरजेचे
NIE
NIEsakal

अकोला - मुलांना मोबाईल, टिव्ही या उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठी एखादातरी छंद लावणे गरजेचे आहे आणि ‘सकाळ’ ‘एनआयई’ या अंकामधून ते निश्चितच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले.

मुले आई-वडिलांच्या सवयींचे अनुकरण करतात. त्याचाच परिणाम म्हणून, सध्या मुले सर्वाधिक वेळ मोबाईल मध्ये घालवत असून, मैदानी खेळ तसेच वाचनवृत्तीतून परावृत्त होत आहेत, म्हणून सकाळच्या एनआयई अंकाचे महत्त्व आहे.

NIE
Akola News : कृषी समितीच्या सभेत २५ हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी; जि.प. कृषी समितीच्या सभेत ठराव.

सकाळ अकोला कार्यालयात शुक्रवारी (ता.४) ‘सकाळ’च्या ‘एनआयई’ अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमावेळी प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, अस्पायर दि इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेन्टचे संचालक सचिन बुरघाटे, समर्थ पब्लिक स्कुलचे संचालक नितीन बाठे, ब्राईट करिअरचे संचालक डॉ. अभय पाटील, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

NIE
Akola : जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना इशारा

सकाळद्वारे प्रकाशित एनआयई या अंकाचे प्रकाशन करून विद्यार्थ्यांकरिता या अंकाचे महत्त्व मान्यवरांनी यावेळी विषद केले. सकाळ एनआयई अंकाचा विद्यार्थ्यांना तसेच समाजाला मोठा फायदा होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्‍यक्त केले.

अंकाचे वैशिष्ट्ये

मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त मजकूर. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यास.विविध उपक्रम व आवडत्या खेळाडू, कलाकारांचे पोस्टर.

NIE
Akola News : चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळतात तेव्‍हा...

मोफत ॲप

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना ‘एनआयई’च्या मोबाईल ॲपचे मोफत सदस्यत्व (सबस्क्रिप्शन) दिले जाईल. यात मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा पाचवी ते दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम, ऑडिओ लेसन्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवणाऱ्या ॲपचा समावेश असेल.

मोबाईल, इंटरनेच्या वापरातील अतिरेकाने मुलांवरील संस्काराची भाषा बदलली आहे. सामाजिक माध्यमांवरिल ३० सेकंदाच्या रिल्समध्ये करमणुकीची परिभाषा झाली आहे. अशा एक तासाच्या करमणुकीत काय पाहाले हे सुद्धा कोणाला आठवत नाही. याचाच अर्थ इंटरनेटवरील या माध्यमांमुळे मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही स्मृतीवर विपरित परिणाम होत आहे. मात्र, ‘सकाळ एनआयई’ अंकाच्या माध्यमातून मुलांना मेंटल डेव्हलपमेंटचा सर्वोत्तम पर्याय मिळत आहे.

- सचिन बुरघाटे, संचालक, अस्पायर दि इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेन्ट

‘सकाळ एनआयई’ अंकाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच सामान्य ज्ञानाचा खजाना आता प्राप्त होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एनआयई हा अंक वाचन संस्कृती व मातृभाषेला पुरस्कृत करते. त्यामुळे या अंकामुळे विद्यार्थी दशेत वाचनाचा छंद जडण्यासाठी मदत होईल व ज्ञानार्जनासोबतच मातृभाषेचे महत्त्व सुद्धा विषद होईल.

- डॉ. गजानन नारे, संचालक, प्रभात किड्स

‘सकाळ एनआयई’ अंकात मुलांना अंतर्भूत करत त्यांच्या मनातील प्रश्न व उत्तरे सुद्धा या माध्यमातून मिळतील. मुलांसोबतच पालकांनाही एनआयई अंकातून बरेच काही शिकायला मिळणार आहे. या अंकात अंतर्भूत असलेल्या विविध विषयांपैकी विद्यार्थ्यांसाठी हेल्दी रेसेपी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना कोणता सकर आहार देणे गरजेचे आहे हे पालकांना कळेल. सकाळ एनआयई अंकाचा समाजाला मोठा फायदा होईल.

- प्रा. नितीन बाठे, समर्थ पब्लिक स्कूल

व्यक्तीमत्त्व विकास करायचा असेल तर, सर्वच विषयांचा अंतर्भाव असलेले चोखंदळ माध्यम उपलब्ध होणे गरजेचे आहे. सकाळ एनआयई अंकात ते सर्वच अपेक्षित विषय प्राप्त होत आहेत. त्यामुळे नक्कीच ‘एनआयई’च्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच सर्वोत्तम गुणांची पायाभरणी होऊन मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास साधता येईल. व्यक्तीमत्त्व विकास झाल्यास चांगली प्रतिभावान पिढी तयार होईल. ‘एनआयई’ मेंटल डायट देत आहे.

- डॉ. अभय पाटील, संचालक, ब्राईट करिअर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com