

Eknath Shinde to Address Rally in Akola
Sakal
अकोला : शिवसेनेचे राष्ट्रीय प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अकोल्यात जाहीरसभा होणार असून या सभेलानंतर अकोल्यातील राजकीय स्तिती बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अकोला महापालिका निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष शिवसेना स्वबळावर लढत असून यावेळी सेनेने प्रथमच ७२ उमेदवार रिंगणात उतरवून भाजपच्या डोकेदुखीत वाढ केली आहे.