

Akola News
esakal
अकोला: संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे पावसात खंड पडण्याची आणि दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील जलसंधारणाची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. पाणीटंचाई, शेती आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.