दहा आठवडे उलटले तरीही कोरोना व्हॅक्सीन मिळेना

कोरोना लसिकरणाच्या दुसऱ्या डोजसाठी नागरिक हवालदिल
दहा आठवडे उलटले तरीही कोरोना व्हॅक्सीन मिळेना

अकोला : कोरोना लसिकरणाला Corona vaccination ६० वर्षे व त्यावरील नागरिकांना देवून सुरवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील लस घेणाऱ्या अनेक नागरिकांना १० आठवडे उलटूनही अद्याप लसीचा दुसरा डोज मिळाला नाही. यात प्रामुख्याने कोवॅक्शिन घेणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. त्यांना वेळेत दुसरा डोज न मिळाल्यामुळे आता पुन्हा पहिला जोड घ्यावा लागणार असल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. ग्रामीण भागात कोवॅक्शिन लस वेळेत उपलब्ध न झाल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. Even after ten weeks of reversal, there is no corona vaccine

महाराष्ट्रात १६ जानेवारी २०२१ पासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसिकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या अकोला आरोग्य मंडळात येणाऱ्या पाच जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत १२.५ लाख नागरिकांचे लसिकरण झाले आहे.

दहा आठवडे उलटले तरीही कोरोना व्हॅक्सीन मिळेना
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

पहिल्या दोन महिन्यांमध्ये लसिकरण व्यवस्थित सुरू होते. ता. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व ता.१ मेपासून १८ ते ४४ वर्षांच्या नागरिकांच्या लसिकरणाला सुरुवात झाली आणि लसीचा तुडवडा भासू लागला. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात लसिकरण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोजसाठी लसच उपलब्ध झाली नाही. ज्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली त्यांच्यासाठी सहा ते आठ आठवडे तर कोवॅक्शिन लस घेणाऱ्यांसाठी दुसऱ्या डोजचा कालावधी चार ते सहा आठवड्यांच्या आता होता. यातील कोविशिल्ड लस घेणाऱ्यांना १२ आठवड्यांपर्यंत लस घेता येणार आहे. मात्र, कोवॅक्शिन घेणाऱ्यांचा दुसरा डोजच उपलब्ध न झाल्याने त्यांची सहा आठवड्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्या पहिला डोजही प्रभावहिन झाल्याचे तज्ञांचे मत आहे. ग्रामीण भागातील लसिकरण केंद्र बंद असल्याने येथील नागरिकांना लसीचा दुसरा डोजच मिळाला नाही. ही परिस्थिती अकोला आरोग्य मंडळात येणाऱ्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सारखीच असल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहे.

दहा आठवडे उलटले तरीही कोरोना व्हॅक्सीन मिळेना
सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू

लसीकरणाचा पहिला डोज घेणाऱ्यांना दुसऱ्या डोजसाठी उशिर झाला तरी घाबरण्याचे काम नाही. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांना दुसरा डोज सहा ते आठ आठवडे व कोवॅक्शिनसाठी चार ते सहा आठवड्यात दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लस घेणाऱ्यांचा पहिला डोज १२ आठवडे प्रभावीपणे काम करतो. त्यामुळे त्यापूर्वी दुसरा डोज घेतला तरी चालतो. कोवॅक्शिनबाबत सहा आठवड्यांपर्यंत डोज घेणे आवश्यक आहे.

- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा लसिकरण अधिकारी

ग्रामीण भागातील केंद्र होते बंद

ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचा पहिला डोज दिल्यानंतर दुसऱ्या डोजची व्यवस्थाच करण्यात आली नाही. अनेक केंद्र गुरुवारपर्यंत बंद होते. त्यामुळे सहा आठवडे उलटून गेलेल्यांच्या दुसऱ्या डोजचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com