esakal | दहशतवादविरोधी पथकाचा दहिहांडा येथे अवैध गुटखा विक्रीवर छापा

बोलून बातमी शोधा

Even though there is a police station at Dahihanda, the anti-terrorism squad has to take action.jpg}

दहीहांडा पोलीस स्टेशन फक्त नावा पुरतेच राहिले आहे. 

दहशतवादविरोधी पथकाचा दहिहांडा येथे अवैध गुटखा विक्रीवर छापा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच गावात अवैध धंदे फोफावले. दहीहांडा येथे पोलीस स्टेशन असतानासुद्धा दहशतवाद विरोधी पथकाला कारवाई करावी लागली आहे. दहीहांडा पोलीस स्टेशन फक्त नावा पुरतेच राहिले आहे. 

अज्ञात ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; दोघे जण जखमी तर एक गंभीर

दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दहीहांडा गावात (ता. 26) फेब्रुवारीला मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना खात्रीशीर खबर मिळाली की सय्यद सलमान सय्यद साबिर (वय 27) वर्ष (रा. मांगपुरा) दहिहांडा हा आपल्या घरात अवैध गुटखा विक्री करत आहे. यावरून छापा मारला असता अरोपीच्या घरातून विमल सितार कालिबहार वाह अस गुटखा किंमत 1 लाख 15, हजार रूपयांचा मुद्देमाल विनापरवाना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.