शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासनाच्या योजना

Every effort should be made to make the schemes of Horticulture, Employment Guarantee Departments available to the general public and farmers..jpg
Every effort should be made to make the schemes of Horticulture, Employment Guarantee Departments available to the general public and farmers..jpg

सिंदखेड राजा (बुलढाणा) : शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासनाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी चांगेफळ येथे केले. 

स्वर्गीय मनकर्णाबाई मोगल यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले आहे. यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित अधिकारी यांना सूचना दिल्या त्यांनी सांगितले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.

फलोत्पादन, रोजगार हमी विभागांच्या योजना सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहे, त्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत या प्रकल्पात अनुदानाची टक्केवारी जवळपास ६५ ते १०० टक्के आहे. त्यामध्ये फळबाग लागवड, सदन फळबाग लागवड, शेडनेट गृह, पॉली हाऊस, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, प्लास्टिक मल्चिंग, फलोत्पादन यांत्रिकीकरण, शेडनेटमध्ये लागवड साहित्य यासह अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःची उन्नती साधावी असे प्रतिपादन केले.

यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजू काका शेळके, भीमराव डोंगरे वाशिम, वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, सरपंच जनार्धन मोगल, सुभाष मोगल मंत्रालय विशेष कार्यकारी अधिकारी सुरेश मोगल, मंत्रालय विशेष कार्यकारी अधिकारी सतिश मोगल, मंत्रालय विशेष कार्य अधिकारी विवेक मोगल, तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, नायब तहसीलदार प्रवीण लटके, ठाणेदार सोमनाथ पवार, आदीजण उपस्थित होते.

वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत मंत्री महोदयांचे फोटो सेशन 

सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ येथे फलोत्पादन रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे आले असताना त्यांनी स्थानिक वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत फोटो सेशन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आज पर्यंत कोणत्याही मंत्र्यानी वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत फोटो सेशन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्याबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वत्र वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत फोटो सेशनीच चर्चा होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com