
अकोला : अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफ बाजारात उत्साह
अकोला - साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीमध्ये मोठी उलाढाल होणे अपेक्षित असल्याने अक्षय तृतीयेच्या पुर्व संध्येलाच सराफ बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. गेले दोन वर्षे कोरोना संकटामुळे अक्षय तृतियाचा मुहूर्त खरेदीदारांना साधता आला नाही. यावर्षी मात्र सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतरही अक्षय तृतीयेला सोने खरेदीमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सराफा बाजारात यावर्षी उलाढाल नियमितपणे सुरू झाली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेलाही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल राहील, अशी अपेक्षा आहे. मार्चपर्यंत ४५ ते ४८ हजार रुपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उसळी घेतली. सोन्याच्या किमतीचा माघारीचा सुरू असलेला प्रवास पुन्हा दरवाढीच्या दिशेने केल्याने एप्रिल अखेर सोन्याचे दर प्रती १० ग्रॅममागे ५२ ते ५५ हजारांपर्यंत पोहोचले आहे. या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली होती. गुढीपाडव्यानंतर सोनेखरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याने दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
गुंतवणुकीचा पर्याय
गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहकांचा आजही या मौल्यवान धातूवर विश्वास आहे. यंदा पाच ते १० टक्के खरेदी वाढण्याची अपेक्षित आहे. कर्णफुले, नेकलेस, पाटल्या बांगड्या आदी प्रकारांना अधिक मागणी असेल, असे मत सरफा व्यावसायिक मनिष हिवराळे यांनी व्यक्त केले.
Web Title: Excitement In Bullion Market On Occasion Akshayya Tritiya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..