Akola News: ‘हॉट सिटी’ अकोला; उकाड्याने जीव कासावीस;तापमानाची धोकादायक झेप; गरम वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत

Akola Faces Extreme Heatwave: अकोला शहरात उष्णतेची भीषण लाट; तापमान ४५.९ अंश सेल्सियस गाठले. गरम वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त, दुपारच्या वेळेस रस्त्यावर शून्य हालचाल.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: सकाळचे दहा वाजताच रस्त्यांवरील डांबर तापू लागते आणि दुपारी बारा वाजेपर्यंत शहर अक्षरशः भट्टीसारखे तापते. अंगावर चटके देणारे ऊन, चेहऱ्यावर झोंबणारे गरम वारे आणि रिकामे पडलेले चौक... अकोल्यातील नागरिक सध्या अशाच उष्णतेच्या भीषण लाटेचा सामना करीत आहेत.

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४५.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, उष्णतेने उच्चांक गाठला आहे. एप्रिलनंतर मे महिन्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com