Kirit Somaiya Reviews Bogus Birth Certificate Case in Akola
sakal
अकोला : जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. या प्रकरणात प्रशासनाने सोमय्या यांना महत्त्वाची माहिती दिली असून अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. जन्म दाखले जमा न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली. जिल्ह्यात नायब तहसीलदार यांच्या आदेशाने नोंदविण्यात आलेल्या ३,०४५ जन्म प्रमाणपत्रांचे आदेश रद्द करण्यात आले होते.