Akola: तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अटक; मुद्देमाल हस्तगत; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या मुसक्या

Fake CBI Officers Arrested Within 12 Hours: सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना अकोला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली.
Akola

Akola

esakal

Updated on

बाळापूर (अकोला): केंद्रीय अन्वेषण विभाग अधिकारी असल्याची बतावणी करून एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून रोख रक्कम आणि मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना बाळापूर बसस्थानक परिसरात घडली होती. मात्र, अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत चपळाईने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत दोन्ही आरोपींना खामगाव येथून अटक केली असून त्यांच्याकडून १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com