
अकोला/जळगाव : यंदाच्या हंगामात बीजी-२ कापूस बियाण्यांच्या बाजारपेठेला मोठा हादरा देणाऱ्या गुजरातमधील एचटीबीटी बियाण्यानंतर विदर्भ आणि खानदेशात आता बनावट कीटनाशकांच्या विक्रीने धुमाकूळ घातला आहे. गुजरातमधून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनी दिली. ही कीटकनाशके स्वस्तात मिळत असल्याने शेतकरी त्याला बळी पडत आहेत.