
संग्रामपूर : शेतातील विहिरीच्या बांधकामावर पाणी मारत असतांना फर्मे तुटून विहिरीत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील निवाना येथे ता.१३ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. सुनील मोहें (वय ४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते दुय्यम निबंधक कार्यालयात लिपिक पदावर नोकरीवर सुद्धा होते.